आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये, आजींना कळले की आप्पा मुद्दाम नचिकेतला त्रास देत आहे जेणेकरून तो त्यांच्या घरापासून दूर राहील. आजी हि बाब खूप तणावाखाली असलेल्या सईची आई आणि काकू यांना सांगतात. आजीने नचिकेतला आप्पा विरुद्ध मदत करण्याचे वचन दिले आहे कारण तिला वाटते की तो एक चांगला मुलगा आहे. दरम्यान, सई नचिकेतला मराठी शिकवत आहे. नचिकेत शिकत असताना आप्पा आत येतात. ते नचिकेतला टोमणा मारत एक कठीण मराठी पुस्तक त्याला देतात. ते नचिकेतला उद्देशून म्हणतात की पुढील दोन आठवड्यांत पुस्तकात जे काही आहे ते त्यास शिकून घ्यावे लागेल. मग, नचिकेत याबद्दल मराठी मंडळाच्या लोकांशी संवाद साधतो. निघताना आप्पा नचिकेतला एक अवघड शब्द देतात आणि पुढच्या 24 तासात या शब्दाचा अर्थ शोधण्यास सांगतात. जर नाचिकेत अपयशी ठरला तर त्याला केतकर घर सोडावे लागेल.
शोचा नवीनतम एपिसोड पहा!
आप्पाची आव्हाने ऐकल्यानंतर केतकर कुटुंबियामधे तणावाचे वातावरण आहे. सईने आप्पांनी नचिकेतला दिलेलं पुस्तक घेऊन काकांना दिले. त्यांनी संपूर्ण पुस्तक वाचून काढले आणि नोट्स काढल्या ज्यामुळे नचिकेतला आप्पाचे आव्हान पूर्ण करण्यास मदत होईल. दुसरीकडे, आजी आणि इतर स्त्रिया आप्पाने नचिकेतला दिलेल्या शब्दाचा अर्थ शोधू लागतात. परंतु सईंसह कुणालाही त्या शब्दाचा अर्थ सापडत नाही.
दुपारच्या जेवणावेळी, नचिकेत मराठीत प्रार्थना करतो आणि आप्पांना त्यांनी दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगतो. आप्पांना धक्का बसतो आणि त्यामुळे ते शांत बसलेले दिसत आहे. दुपारचे जेवण झाल्यावर, आपांनी जमिनीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वकीलाला गाठण्याचा निर्णय घेतला.
पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.
अधिक मनोरंजनासाठी, आपल्या लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.