ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 13 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट : नचिकेत आव्हान जिंकेल काय?

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या भागात नचिकेत अडखळत का होईना पण मराठी मंडळाच्या लोकांसमोर मराठीत बोलतो.

Scene from Almost Sufal sampoorna (10)

आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या आज सई आणि नचिकेत स्वयंपाकघरात आहेत. सई नचिकेतला रोजलिनबद्दल विचारण्याचा प्रयत्न करते पण तो तिचा प्रश्न टाळतो. मग नचिकेत सईला प्रपोज करण्याविषयी विचार करतो पण मग तो विचार सोडून देतो. सई अजूनही नचिकेतला बोलण्यास उद्युक्त करणायचा प्रयत्न करते पण तो बोलत नाही. यानंतर, ते दोघेही अभ्यासाचे सत्र सुरू ठेवतात. दुसरीकडे केतकर कुटुंबीय आप्पाकडे जातात. सईची आई आप्पाला सांगते की नचिकेतने जर मराठी मंडळाच्या लोकांना प्रभावित केले तर आप्पाने त्याच्याकडे पैसे मागणे बंद केले पाहिजे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, नचिकेत मराठीत बोलू शकणार नाही हे जाणून ओव्हर कॉन्फिडेन्ट आप्पा हे मान्य करतात.

शोचा नवीनतम भाग पहा!

त्यानंतर आप्पा खाली उतरतात आणि नचिकेतला सांगतात की, जर त्याने आव्हान जिंकले तर तो विनामूल्य केतकर घरात राहू शकतो. जर नचिकेत हरला तर त्याला घर सोडावे लागेल. आप्पा तेथून गेल्यानंतर सई आणि नचिकेत यांनी अभ्यास सत्र सुरू ठेवले. सई नचिकेतला शुद्ध मराठीत स्वत: चा परिचय कसा हे शिकवत आहे. तो वेगवेगळ्या शब्दांशी झगडत आहे पण सई त्याला अधिक मेहनत घेण्यास प्रवृत्त करते.

आणि नचिकेतचा चाचणीचा दिवस आला. केतकर घरात मराठी मंडळाचे लोक येतात तेव्हा नचिकेत त्यांना अचूक मराठीत अभिवादन करतो. ते त्याच्या कौशल्यावर प्रभावित होतात आणि त्याचे कौतुक करतात. संभाषण ऐकणारा आप्पा नचिकेतला टोमणे मारण्याचा प्रयत्न करीत आहे. मराठी मंडळाचे लोक नचिकेतला सईबद्दल बोलण्यास सांगतात. नचिकेत अडखळत अडखळत का होईना सईबद्दल सकारात्मक गोष्टी सांगतो, त्याच्या अडखळण्यावर आप्पाला मात्र बरे वाटत आहे.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका व नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share