ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 19 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: केतकर कुटुंबात आनंदाचे वातावरण

आजी आणि आप्पा तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी निघतात, त्यामुळे केतकर कुटुंब आनंदात आहे.

Scene from Almost Sufal Sampoorna

आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये आप्पा नचिकेतला म्हणतात की त्याला घराबाहेर पडावे लागेल. जर त्याने तसे केले नाही तर आप्पा वकीलांना यात सामील करतील आणि नचिकेत यांना आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतील. आप्पांची धमकी ऐकून नचिकेतला धक्का बसला आणि तो म्हणाला की त्याच्याबरोबरच अप्पांनासुद्धा कोर्टात बोलावले जाईल. नचिकेतचा मुद्दा ऐकून आप्पा चिडतात. नंतर, केतकर घरात पुढील 15 वर्ष राहण्याची परवानगी आपल्याला आपल्या पालकांकडून मिळाल्याची नचिकेत जाहीर करतो. त्यानंतर आप्पा तेथून निघून जातात.

शोचा नवीनतम भाग पहा!

रात्री, काका आणि काकू यांना चिनूच्या उपस्थितीत गोपनीयतेचा अभाव जाणवत आहे. यादरम्यान, त्यांना सईच्या पालकांच्या खोलीतून गाणी ऐकू येतात. काका आणि काकू त्यांच्या खोलीत जाऊन सईच्या पालकांसमवेत गाण्यात सामील होतात. ते नाचत असतानाच नचिकेत आणि सई हसत हसत आत येतात. सईचे वडील आणि कला नचिकेतला सांगतात की आप्पांच्या नियमांमुळे त्यांना घरात पाश्चात्य संगीतावर नाचण्याची परवानगी नाही. नचिकेतला धक्का बसतो आणि तो परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतो.

आजी आत येतात आणि त्यांना आश्वासन देतात की त्या आप्पांना काही काळ घरापासून दूर नेतील. आप्पांच्या अनुपस्थितीत कुटुंब निर्भयपणे जे काही करू इच्छित आहे ते करू शकते. प्रत्येकजण या कल्पनेशी सहमत आहे आणि जो तो दुसरा उजाडण्याची वाट पाहतो. दुसर्‍या दिवशी, आजी आणि आप्पा बाहेर जाण्यासाठी तयार आहेत. सईने आप्पांचा तुटलेले चष्मा नीट करून दिला त्यांनतर आप्पा आजीबरोबर जातात. केतकर कुटुंबीय तीर्थस्थाळांना भेटीसाठी जाणाऱ्या आप्पा आणि आजीला आनंदाने निरोप देत्ता .

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका व नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share