ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 20 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई सर्वांसमोर नृत्य सादर करते

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, सईचे कुटुंब तिला नृत्य करण्यास प्रोत्साहित करतात आणि ती त्यांच्या आज्ञेचे पालन करते.

Scene from Almost Sufal Sampoorna.

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेच्या आज रात्रीच्या भागात, आजी आप्पांना देवदर्शनासाठी बाहेर घेऊन गेल्या, जेणेकरून कुटुंबातील उर्वरित सदस्य आप्पांच्या अनुपस्थितीत मनमोकळेपणाने वापरू शकतील, आपला आनंद व्यक्त करू शकतील . आप्पा आणि आजी मंदिरात असताना, आप्पांनी नचिकेतने कसेही करून घरातून बाहेर पडावे म्हणून देवाकडे प्रार्थना केली. आप्पांच्या विरुध्द आजीची आशा आहे की, नचिकेतने त्यांच्या कुटुंबासमवेत बराच काळ रहावे कारण त्याने त्यांना खूप आनंद दिला आहे. मग, आप्पा आणि आजी पुढच्या मंदिरात जातात. रस्त्यावरून चालत असताना आप्पांनी रिक्षा करण्यास नकार दिला आणि त्याऐवजी चालत राहण्याचा नकार दिला. आजीने विनंती केली तरीही त्यांना प्रवासात पैसे खर्च करायचे नाही आहेत.

शोचा नवीनतम भाग पहा!

केतकर घरात, सईचे काका आणि काकू गात आहेत. मग, बरीचशी समजूत काढल्यानंतर सईच्या वडिलांनी मिमिक्री करून दाखवली. यानंतर सईचा नृत्य करण्यासाठी क्रमांक येतो. या दरम्यान, नचिकेत सुंदर नृत्य करणाऱ्या सईकडे एकटक पाहणे थांबवू शकत नाही. तिचे कुटुंबीय तिच्यावर कौतुकांचा वर्षाव करतात आणि तिला कविता म्हणण्यास प्रोत्साहित करतात. सई सर्वांच्या आज्ञेला मान देते पण कविता शुद्ध मराठीत असल्याने नचिकेतला समजत नाही. तो तिला तिचा अर्थ विचारतो पण सई त्याला त्या कवितेचा अर्थ स्वतःच शोधण्यास सांगते.

त्यांच्या मंदिर भेटी दरम्यान, आप्पा थकल्यासारखे वाटतात आणि जवळच्या बाकावर बसण्याचा निर्णय घेतात. आजी त्यांना पाणी देत असताना, आप्पा अचानक ओरडतात आणि बाकावरून ताडकन उठतात, कारण बाकाला नवीन पेंट केले आहे. पेंट आप्पांच्या धोतीला चिटकल्यामुळे आजी हसू लागते. या पेचप्रसंगामुळे आप्पा आजीला म्हणतात की त्यांनी आपली मंदिर दर्शन योजना काही दिवसांनी कमी करून घरी परत जावे. आजी चिंतीत होते आणि निषेध करण्याचा प्रयत्न करतो, तथापि, आप्पा त्यांचे काही ऐकत नाही.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share