ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, नचिकेतच्या ऑटोची आप्पाला धडक बसते. नचिकेतला अपराधी वाटावे म्हणून आप्पा जखमी झाल्याची बतावणी करतात.

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेच्या आज रात्रीच्या एपिसोडमध्ये, सई आजीला स्वयंपाकासाठी मदत करत असताना, आजीकडून सईला तिच्या आज्ञाधारकपणा आणि परिपक्वतेबद्दल शाबासकी मिळते. त्यांच्या संभाषणादरम्यान, सईचे बोट कापले जाते, आजी चिंताग्रस्त होते. सईची आई आल्यानंतर तिने सईला विश्रांती घेण्यास तसेच नचिकेतला बोलवायला सांगितले. नचिकेत कोठे गेला आहे हे केतकर घरातील कुठल्याच सदस्याला माहिती नाही आणि सईला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, नचिकेत आप्पा जिथे गेले आहेत त्या वकिलांच्या कार्यालयात पोहोचण्याचा प्रयत्नात आहे. आप्पांची सर्वात नवीन योजना जाणून घेण्यासाठी त्याला आप्पा आणि वकीलांचे संभाषण ऐकणे गरजेचे आहे. तथापि, नचिकेत एक ऑटो मिळवण्यासाठी धडपडत आहे.

शोचा नवीनतम भाग पाहा:

आप्पा आणि वकील नचिकेतबद्दलच बोलत आहेत. आप्पा जबरदस्तीने नचिकेतला घराबाहेर काढू शकत नसल्यामुळे त्याला इतर डावपेच अंमलात आणावे लागणार आहेत. वकिलांनी आप्पाला सुचवले की नचिकेतला अंधारात ठेऊन त्याच्यावर हल्लाबोल करावा लागेल. त्यासाठी आप्पांनी नचिकेतशी गोड बोलायला सुरुवात करायला हवी. त्यांनी नचिकेतचा अपमान करु नये आणि त्याला ‘कांगारू’ ऐवजी त्याच्या नावाने हाक मारावी. आप्पा अनिच्छेने सहमत होतात आणि घरच्या दिशेने निघतात.

वकील कार्यालयात जाताना नचिकेत आपल्या ऑटो चालकास ऑटो वेगाने चालवण्यास सांगितले. या दरम्यान सई नचिकेतला कॉल करते, ते दोघे बोलत असताना आप्पा अचानक नचिकेतच्या रिक्षासमोर येतात. आप्पाला धडक बसून ते बेशुद्ध पडतात. घरी एकटी असलेलया सईला, आप्पांसोबत काहीतरी वाईट घडले आहे असे वाटून ती पार बिथरून जाते. नचिकेत आप्पांना घरी घेऊन येतो, आता हे कुणालाच माहित नसते की आप्पा बेशुद्ध असल्याचे भासवत आहेत.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी, लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share