ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 26 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतमध्ये भावनिक नातं

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, सई आणि नचिकेत यांनी एकत्र वेळ घालवत भावनिक क्षणांचे आदान-प्रदान केले.

Scenes from Almost Sufal Sampoorna.

आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये सई आणि नचिकेत आप्पांची काळजी घेत आहेत. सई आप्पांना दही-भात वाढत असताना नचिकेत त्यांच्यासाठी हर्बल कंकोशन बनवित आहे. नचिकेतला डिवचण्यासाठी, आप्पा नचिकेतकडून कठोर परिश्रम करून घेत आहेत. नचिकेत आप्पांना प्रत्युत्तर न देता सांगितल्याप्रमाणे सूचनांचे पालन करतो. या दरम्यान, आप्पांऐवजी सई त्यालाच जेवायला वाढत आहे असे तो स्वप्न बघतो. आपल्याच जगात हरवलेल्या नचिकेतला सई बघते. त्याची थट्टा करण्यासाठी, आप्पा पाहत नसताना सई त्याला एक आंबट लिंबू लोणचे खायला घालते आणि नचिकेतवर खळखळून हसते.

शोचा नवीनतम भाग पहा:

केतकर घराच्या बायका आश्चर्यचकित आहेत की नचिकेत आणि सई आप्पांबरोबर काय करत आहेत. ते दोघेही दुपारच्या जेवणाला खाली उतरले नसल्यामुळे, आजी काळजीत पडली आहे. थोड्या वेळाने, नचिकेत आणि सई खाली येऊन कुटुंबातील इतर सदस्यांसह जेवायला बसतात. जेव्हा ते दोघे एकटे असतात तेव्हा सई त्याला सांगते की भारतीय संस्कृतीत स्त्रीला तिच्याशी संबंधित नसलेल्या पुरुषाला जेवन भरवण्याची परवानगी नाही. नचिकेतला हे काही समजत नाही.

मग, नचिकेत डिग्सबरोबर वेळ घालवण्यासाठी बाहेर जातो आणि त्याच्याशी सईबद्दल बोलू लागतो. दुसरीकडे, तीही नचिकेतबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही. लिंबाचे लोणचे त्याला खायला दिल्याबद्दल त्याला राग तर आला नसेल ना? असा विचार करत असताना त्याने तिला कॉल केला. दरम्यान, आप्पांची देखभाल करण्याच्या नाचिकेतच्या प्रयत्नांचे आजीने कौतुक केले.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा. अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share