आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये सई नचिकेतला रोजलीनच्या नावाने संदेश पाठवते की तिला त्याला भेटायचे आहे. मग, ती चिंताग्रस्त होते आणि नचिकेतची प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाते. रोजलींच्या मजकुरामुळे नचिकेत तणावात आहे आणि म्हणून ती त्याला विचारते तू कसा आहेस? नचिकेत गेल्यानंतर आप्पा सईला विचारतात की जे चाललंय ते त्यांना काही ठीक दिसत नाही आहे, तू ठीक आहेस ना? सई काहीच सांगत नाही. साईच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी आप्पा आणि आजी उत्सुक आहेत.
शोचा नवीनतम एपिसड पाहा!
नचिकेत, सईच्या प्रॅन्कमुळे अस्वस्थ आहे. तो मित्रांना सांगतो की रोजलीन त्याला मेसेज करणे शक्य नाही कारण ती वास्तवात नाहीच आहे. तो समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. मग नचिकेतने रोजलीनला कॉल केला पण फोन काकूंचा वाजला, कारण सई सिमकार्ड बदलणे विसरली आहे. काकू तिच्या समोर उभा असलेल्या नचिकेतला तिला कॉल करणे बंद कर म्हणून बजावते.
नचिकेत या संपूर्ण प्रकरणामुळे गोंधळलेला आहे. मग, सई काकूंकडे फोनची मागणी करते जिने नचिकेतवर प्रॅन्क केलेलं आहे. आता त्याला कळत नाही आहे कि सईला काय बोलावे? कारण त्याने सईला रोजलीनलाबद्दल खोटे सांगितले आहे. नचिकेत घाबरलेला आहे आणि सोबत उत्सुकही झाला आहे कारण तो सईला भेटणार आहे आणि त्याने तिला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला.
पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.
अधिक मनोरंजनासाठी ZEE 5 वर लोकप्रिय मराठी मालिका व नवीन चित्रपट पहा.