ऑलमोस्ट सुफळ सपूर्ण 9 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई बनते नचिकेतची शिक्षिका

सई नचिकेतला मराठी भाषा शिकवण्यासाठी तयार आहे. पण आप्पा या प्रस्तावाला मंजुरी देतील?

Sai from Almost Sufal Sampoorna

आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ सपूर्णच्या एपिसोडमध्ये आप्पा लवकर उठतात आणि विचार करतात की नचिकेत अजूनही खर्राटे मारत झोपला असेल. तथापि, नचिकेत आप्पाबरोबर टिपिकल मराठमोळ्या कपड्यांमध्ये आपल्या क्लासला जाण्यासाठी आधीच तयार झाला आहे हे पाहून आप्पा निराश होतात. आप्पा आणि नचिकेत यांनी आपला श्वासोच्छवास आणि योग सत्र सुरू केला आहे, परंतु नचिकेत आप्पासारखे आसन करण्यास सक्षम नाही. तो लवकर थकून जातो, त्यामुळे आप्पा त्याच्यावर रागावतात. वचनबद्धतेच्या अभावामुळे ते नचिकेतवर ओरडतात सुद्धा.

शोचा नवीनतम भाग पाहा!

योगाचा सत्र संपल्यावर, आजी नचिकेतला आयुर्वेदिक काडा प्यायला देते पण कडू काडा नचिकेतच्या घश्याखाली उतरत नाही. ते दोघेही काडा टाकून देण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर आजी आणि नचिकेत काड्यासंदर्भात आप्पांकडे जातात. नचिकेत आपांशी खोटे बोलण्याचा प्रयत्न करतो पण ते काही त्याला जमत नाही. ते जबरदस्तीने नचिकेतला आपला काडा प्यायला लावतात. शेवटी नचिकेत समोरही काडा पिण्यावाचून पर्याय उरत नाही.

या संभाषणादरम्यान नचिकेत सूचित करतो की कदाचित सई त्याला मराठी शिकवू शकते. तथापि, चिंताग्रस्त सई ही ऑफर नाकारते आणि ती तिथून निघते. सई रिचाला भेटायला जाते आणि तिला आप्पा आणि नचिकेत यांच्या योग सत्रांविषयी सांगते. दरम्यान, आजी नचिकेतच्या मराठी भाषा शिकण्याच्या दृढनिश्चयाचे कौतुक करते. नचिकेतबद्दल चांगल्या गोष्टी ऐकून आप्पांची चिडचिड होते आणि ते आजीवर ओरडू लागतात.

रात्री सई आणि नचिकेत फोनवर बोलतात. या संभाषणादरम्यान, नचिकेत सईकडे आपले शिक्षक होण्यासंदर्भात आग्रह करतो.

पुढील भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share