हॉर्न ओके प्लीज ही सीरिज तुम्हाला तुमच्या खट्याळ बालपणाची आठवण करुन देईल

अद्विक आणि गायत्री यांच्यातील भांडण तुम्हांला तुमच्या बालपणात घेऊन जाईल.

Virajas Kulkarni and Isha Keskar in a still from ZEE5 Original Horn Ok Please.

माझ्या बालपणी मी लवकर मोठे व्हावे असे वाटायचे. पण, आता कॉर्पोरेट दुनियेत जगत असताना तारुण्य नको वाटून जगण्यासाठी बालपणीचा काळच योग्य असल्याची खात्री मला पटली आहे. कदाचित माझी हीच ईच्छा ZEE5 ने “हॉर्न ओके प्लिज” या सीरिजच्या रुपाने पूर्ण केली आणि मला सीरिजच्या माध्यमातून पुन्हा बालपण अनुभवता आले.

आपण पुढे जाण्यापूर्वी, हॉर्न ओके प्लिज कृपया खाली पाहा:

अद्विक देशपांडे आणि गायत्री बेलवलकर या दोन रूममेट्सच्या कथेतून आपणांस त्यांच्या दैनंदिन जीवनातील / छोट्या मोठ्या भांडणाची झलक पाहू शकाल. विपरीत व्यक्तिमत्त्वांमुळे होणारे दोघांमधील वाद प्रेक्षकांसाठी कमालीचे मनोरंजक ठरतील. महत्त्वाचे म्हणजे, हॉर्न ओके प्लीजची कथा प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर टॉम Jऍण्ड जेरीशी मिळतीजुळती आहे. टॉमला चिडवण्यासाठी जेरीने ज्या प्रकारे उपाय शोधते अगदी तसेच गायत्री (ईशा केसकर) अद्विकला (विराजस कुलकर्णी) डिवचते आणि दोघांमध्ये नेहमीच वाद होतात आणि त्याच वादातून निर्माण होते सुरेल मैत्री.

विराजस कुलकर्णी आणि ईशा केसकर झेडईई 5 ओरिजनल हॉर्न ओके प्लीज मधील.
Virajas Kulkarni and Isha Keskar in a still from ZEE5 Original Horn Ok Please.

कॅचअप् च्या बाटलीवरून किंवा दोघांनीही दरवाजा उघडण्यास नकार दिल्यासारख्या गंभीर कारणास्तव ईशा आणि विराजसमध्ये ऑनस्क्रीन जबरदस्त हाणामारी होते. या सर्व गोष्टींमधून त्यांच्यात लपलेले निरागस मूल पाहणे अतिशय आनंददायक ठरू शकेल.

हॉर्न ओके प्लीज या सीरिजमधील तुम्हांला नक्की कोणती गोष्ट आवडली हे आम्हाला टिप्पण्यांमध्ये नक्की कळवा.

अमर्यादित करमणुकीसाठी तुमच्या आवडत्या ZEE5 वर मराठी ओरिजनल्समध्ये पाहायला विसरु नका.

तसेच

वाचले गेलेले

Share