मनवा आपल्याला दाखवतेय ‘तू अशी जवळी राहा’ च्या कलाकारांमधील एकमेकांबद्दलची आपुलकी

तितिक्षा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मनवाने शेअर केला सेटवरचा धमाल व्हिडीओ...

Tu Ashi Jawali Raha

मनवा, ती साकारत असलेल्या तितिक्षा तावडे व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध आहे, आता तिला तिचे ऑनस्क्रीन पती राजवीरचे आभार मानावे लागले आहे. तू अशी जवळी राहा या मालिकेतील दोघांची जोडी लोकांना आवडतं आहे. राजवीर तितिक्षाला तिच्या आईवडिलांपासून व तिच्या भावापासून वेगळे करण्यात यशस्वी झाला आहे. मनवा ऑनस्क्रीन जितकी दुःखी आहे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती तिच्या खऱ्या आयुष्यात आहे. म्हणजे, जेव्हा सेट वर कास्ट शूटिंग करत नाही तेव्हा वातावरण कसं असतं याविषयी तितिक्षाने आपल्याला एक झलक दिली.

तू अशी जवळी राहाचा एपिसोड पाहाः

तू अशी जवळी राहामध्ये राजवीर आणि मनवामध्ये जरी वाद असले तरी कॅमेरे बंद झाल्यावर मात्र तितिक्षा आणि इतर कलाकार सेट वर खूप मजा करतात. सेट वरच्या फावल्या वेळेत तितिक्षा आणि इतर कलाकार मिळून एक बुमरँग व्हिडीओ बनवायचा प्रयत्न करत होते आणि त्यामुळेच आपल्याला एक मजेदार व्हिडीओ पाहायला मिळाला.

या सर्वांमध्ये काका म्हणजेच अमोल बावडेकर हे देखील मनवाच्या विरोधातील आपल्या कारस्थान बाजूला ठेऊन या सर्वांबरोबर मजा करताना दिसत आहेत. या सगळ्यात फक्त मालिकेचा मुख्य कलाकार सिद्धार्थ बोडके (जो सध्या त्याच्या ‘अनन्या’ नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने अमेरिकेत आहे) दिसत नाहीये. हा व्हिडीओ खरोखर अतिशय मनोरंजक आहे.

या शो वर आपले विचार काय आहेत? आम्हाला आपल्या टिप्पणीच्या माध्यमातून कळवा .

अधिक मनोरंजनासाठी, आम्ही दोघी ZEE5 वर विनामूल्य पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share