तू अशी जवळी राहा मधील राजवीर आणि साजणा मधील आईसाहेबांच्या कपड्यांची मॅचिंग

झी युवा कलाकारांनी परिधान केले मॅचिंग कपडे, आणि मिळून काढले एकमेकांचे फोटो

Aaisaheb from Saajana

हॉलीवूडचा आणि बॉलिवूडचा रेड कार्पेट हा एक पुरावा आहे कि ख्यातनाम सेलिब्रिटी हे एकमेकांशी मिळते- जुळते कपडे परिधान करतात. वेगवेगळ्या आवडी- निवडीनंतरही सेलिब्रेटी एकमेकांशी जुळवून घेतात. जेव्हा असे घडते तेव्हा एक सेलिब्रिटी दुसऱ्या सेलिब्रेटीची तारीफ करतो ज्याने प्रेक्षक आणि मीडिया सर्वाधिक चकित होतात. जेव्हा मराठी सेलिब्रिटी एकमेकांशी मिळते- जुळते कपडे परिधान करतात, तेव्हा ते एकमेकांसोबत फोटो क्लिक करतात आणि हसतात! हे बघा.

खाली साजणाचा एपिसोड पाहा:

झी युवा कुटूंबाचा भाग असल्याने विविध मालिकांमधील कलाकार अनेकदा कॅमेर्‍याच्या मागे भेटतात आणि अभिवादन करतात. अशाच एका कार्यक्रमात, साजणा अभिनेत्री प्रज्ञा जवळे एडके आणि तू अशी जवळी राहा स्टार सिद्धार्थ बोडके यांनी योगायोगाने एक जुळून आलेला क्षण आमच्याशी शेअर केला. दोन्ही कलाकारांना नारंगी कपड्यांमध्ये पहिले गेले होते. आईसाहेबानीं सुद्धा एकदम आनंदाने राजवीरसोबत काही फोटो क्लिक केले.

या वेगळ्या लुकमध्ये प्रज्ञाला पाहून छान वाटले कारण साजणामध्ये ती नेहमीच टिपिकल महाराष्ट्रीयन साडी परिधान करत असते. दरम्यान, सिद्धार्थही नारंगी रंगात सुंदर दिसत होता कारण तू अशी जवळी राहामध्ये तो क्वचितच आपल्याला या अश्या गेटअप मध्ये दिसतो. ह्या सेलिब्रिटींना पाहिल्यानंतर, आता त्यांच्या शोबद्दल आपले काय मत आहे? खाली टिप्पण्यामार्फत आम्हाला सांगा. तसेच, ह्या दोघांमध्ये सर्वात सुंदर कोण दिसत आहे?

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्यासाठी ZEE5 वर तयार केलेली खास दिवाळी मूव्ही प्लेलिस्ट पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share