साजणा: रमा वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचेल का?

रमा वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी धडपडत आहे. अधिक माहितीसाठी हा लेख वाचा!

Rama from Saajana

साजणामध्ये, रमाने तिच्या कामाबद्दल आणि शिक्षणाविषयी केलेलया दृढनिश्चयाने हे सिद्ध झाले की जाणीवपूर्वक, लक्ष देऊन मेहनत केली तर काहीही अशक्य नाही. काम करत असताना देखील रमाने तिच्या अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष केले नाही. ज्या दिवशी प्रतापच्या घरी बरेच काम करायचे होते, त्यादिवशी रमाला अभ्यासाची पुस्तके मिळतात आणि ती परीक्षेच्या तयारीसाठी स्वयंपाकघरात जाऊन अभ्यास करते. तथापि, पूर्वावलोकनात, रमाला तिच्या परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी धडपडताना आपण पाहिले. तुम्हाला वाटतं तिने केलेले परिश्रम वाया जाणार नाही?

खाली साजणाचा भाग पाहा:

 

रमाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी प्रतापने स्वेच्छेने रमाला गाडीतून परीक्षा केंद्रावर सोडण्याची व्यवस्था केली. तथापि, परीक्षा केंद्राकडे जात असताना रस्त्यात झालेल्या अपघातामुळे त्यांची गाडी रस्त्यातच अडकते. परीक्षेची वेळ जवळ येत होती परंतु प्रतापची गाडी जागेवरून हलेना. शेवटी, दोघांनी ठरवले की रमा पुढे तिच्या परीक्षा केंद्रात जाईल आणि गाडीच्या ठिकाणी राहून अपघातग्रस्तांना मदत करेल. रमाकडे वेळ नसल्यामुळे तिने ऑटो मिळवण्याचा प्रयत्न करता करता काही मैलांची वाटचाल केली. पण रिक्षा काही मिळाली नाही. याचा परिणाम म्हणून रमा धावू लागते आणि रस्त्यात तिची चप्पल तुटते.

या क्षणी, प्रत्यक्षात तिच्या मदतीसाठी कोणीही नाही. प्रताप अपघातग्रस्तांना मदत करण्यात व्यस्त असताना, परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी रमाला खूप धडपड करावी लागते. आपण फक्त आशा बाळगू शकतो की ती वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचो आणि तिला पेपर चांगला जाओ. ही परिस्थिती पाहून रमाला तुम्ही काय सुचवाल? खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार सांगा.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीनतम एपिसोड ZEE5 वर विनामूल्य पाहा.

तसेच

वाचले गेलेले

Share