साजणा : रावसाहेबांनी रमाला अपमानित केले यावर आपण विश्वास ठेऊन शकत नाही

रमाच्या सत्कार सोहळ्यात रावसाहेबांनी रमाला नोकर म्हणून संबोधले, त्यामुळे रामाला वाईट वाटले.

साजणामध्ये, रमा तिच्या गावातील महिलांना आर्थिक स्वतंत्र करून सुधारत आहे. या उदात्त कार्यासाठी तिला प्रताप आणि त्याच्या कुटुंबाचे पाठबळ आहे. प्रतापचे वडील रावसाहेबांनी रमाच्या गुणांचे सर्वांसमोर कौतुक करण्यासाठी तिचा सत्कार करण्याची संधी साधली. या सत्कार समारंभात रावसाहेबांनी आलेल्या पाहुण्यांना आपण त्यांच्या घरातल्या नोकरदारांना किती चांगली वागणूक देतो हे जाहीर केले. साहजिकच रमाला अवघडल्यासारखे वाटते. रमाला स्वत:च्या यशासाठी साजरी करण्यात येणाऱ्या पार्टीतच लाज वाटली. आपणास काय वाटते, रावसाहेबांनी योग्य केले?

खाली साजणाचा भाग पाहा:

आत्तापर्यंत आपण सर्व जण रावसाहेबांच्या स्वभावाविषयी चांगल्या प्रकारे परिचित आहोत. एक राजकारणी असल्याने ते काहीही बोलण्याइतपत मूर्ख नाहीत, जेव्हा तो लोकांसमवेत असतात तेव्हा ते आपला प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडतात. आणि ते तर आपली मानवतेची बाजू दर्शविण्यास कधीही अपयशी ठरत नाही. यावेळी, रावसाहेबांनी रमाच्या सत्कार समारंभाच्या संधीचा उपयोग जगाला आपली दयाळू बाजू दाखवण्यासाठी करून घेतला. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने महिलांच्या सबलीकरणाला किती महत्त्व दिले आणि त्यांच्या नोकरांना किती मदत केली याविषयी त्यांनी आपल्या भाषणावर भर दिला. या शब्दांमुळे रमाच्या चेहऱ्यावरील हसू मावळले तसेच आईसाहेब आणि प्रताप यांनासुद्धा रावसाहेबांच्या वागण्यामुळे लाज वाटली परंतु ते लोकांसमोर असहाय्य होते.

रावसाहेबांना अद्याप हे माहित नाही की जिला ते ‘नोकर’ म्हणतात ती रमा आपल्या मुलाची खूप जवळची मैत्रीण आहे. आम्हाला आश्चर्य वाटतंय की रावसाहेब या रहस्याला कसे स्वीकारतील? हे वाचल्यानंतर आम्हाला या परिस्थितीबद्दल आपले विचार जाणून घेण्यास आवडेल. खाली टिप्पण्यामध्ये व्यक्त व्हा.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीनतम भाग विनामूल्य पाहा फक्त ZEE5 वर.

तसेच

वाचले गेलेले

Share